भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॅार्डर गावस्कर ट्रॅाफीसाठी खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामना दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. मोहम्मद शमी संघातील आपल्या सहकाऱ्यांसह मैदानावर असताना काही प्रेक्षकांनी त्याला पाहून जय श्री राम असे नारे दिले. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी
ट्विट करत या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे